ईडी चौकशी टाळून अनिल परब शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला

दापोली रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांनी ईडीने समन्स पाठवलं असून त्यांना आज हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
ANil Parab Shirdi
ANil Parab ShirdiSakal

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं होतं. या चौकशीसाठी त्यांना आज उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ईडी चौकशीला जाण्याऐवजी अनिल परब (Anil Parab) आज शिर्डी इथं साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत.

ANil Parab Shirdi
परिवहन मंत्री अनिल परब यांना दुसऱ्यांदा ईडीचे समन्स

अनिल परब यांना आज ईडीने चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अनिल परब हे चौकशी टाळून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले आहेत. काही वेळापूर्वीच अनिल परब शिर्डीच्या साईबाबा मंदिरात (Shirdi Saibaba Temple) दाखल झाले आणि त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले.

ANil Parab Shirdi
दापोली रिसॉर्ट प्रकरण: अनिल परब यांना ईडीचं समन्स; आज हजर राहण्याचे आदेश

भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी परबांवर मनी लाँडरिंगचा आरोप करत पुरावे ईडी कार्यालयाकडे सोपवले होते. दापोली इथं परबांना बेकायदेशीर रिसॉर्ट असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्या मालमत्तांवर धाडी पडल्या. त्यानंतर परब यांना ईडीने समन्स देत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com