अण्णांची पुन्हा नेत्यांची "पोथी" उघडण्याची भाषा, महाविकास आघाडीतील नेते अलर्ट

Anna Hazare warns political leaders
Anna Hazare warns political leaders

पारनेर ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा कडाडले आहेत. मी मागे लागलो तर पळायला रान पुरणार नाही, अशा आशयाच्या त्यांच्या विधानाने राजकीय नेत्यांनी धसका घेतलायं. मागील आठवड्यात शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून त्यांच्यावर टीका केली होती. त्यावेळीही अण्णांनी पलटवार करताना मंत्र्यांना घरी घालवण्याची भाषा केली होती. त्याचा पुनरूच्चार अण्णांनी केला आहे. यावेळी महाविकास आघाडीतील नेमके कोणते नेते त्यांच्या रडारवर आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. अण्णांचा इशारा महाविकास आघाडीलाच असल्याची चर्चा आहे.

 ""मी कधीही कोणताही पक्ष वा व्यक्तीच्या विरोधात आंदोलन करीत नाही. मी समाजहितासाठी आंदोलन करतो, वैयक्तीक स्वार्थासाठी नाही. आंदोलन मागे घेतल्याने माझ्यावर होणारी टीका काही मला नवीन नाही. आतापर्यंत मी सर्वच पक्षांविरोधात आंदोलने केली. अनेक राजकारणी नेत्यांच्या पोथ्या माझ्याकडे आहेत, त्या उघडल्या अनेकांना मोठा धक्का बसेल,'' अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका करणाऱ्यांना इशारा दिला. 

देशात सर्वच राज्यांत शेतमालाचा उत्पादनखर्च सारखा येत नाही. तसेच, उत्पादनही कमी-अधिक प्रमाणात असते; मग देशभरात एकच हमीभाव कसा योग्य राहिल, या प्रश्‍नावर हजारे म्हणाले, ""सध्या सरकारी पातळीवर कृषी विभाग फळबाग लागवडीसाठी रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना झाडे, खड्डे खोदणे, खते, तसेच इतर मशागतीसाठी अनुदान, मजुरीसुद्धा देते. त्याच धर्तीवर देशभरातील दुष्काळग्रस्त, जिरायती भागातील शेतकऱ्यांना सरकारने शेतीची मशागत, पीकपेरणी वा लागवडीसाठी, पिकांची काढणी वा तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून शेतमजूर किंवा मजुरी देऊन मदत करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास, सरकारला हमीभाव ठरविणे सोपे जाईल. कारण, त्यामुळे जिरायती वा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च आपोआप कमी होईल व जो हमीभाव जाहीर होईल, तो त्यांना आपोआप परवडेल.'' 
शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन खर्च कमी होईल. त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यास पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी होणार नाहीत. कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मोठी मदत होणार आहे, असे हजारे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com