
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचे, आवाहन येथील विविध राजकीय पक्षासह विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रीरामपूर (अहमदनगर) : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचे, आवाहन येथील विविध राजकीय पक्षासह विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने शेतकरी प्रतिनीधीसह संघटनांशी चर्चेशिवाय कृषी संबंधित कायदे मंजूर केले. संसदेत चर्चा करण्यात आली नाही. कोणत्याही शेतकरी संघटनेने मागणी केली. नसताना शेतकरी हिताच्या नावाखाली सदर कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारले. हे लोकशाही प्रक्रियेला धरून नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत त्यांनी घूमजाव केले आहे.
तोंडी आश्वासनाऐवजी शेतकऱ्यांना आधारभूत किमतीचा कायदा हवा आहे. तसेच आंदोलनातून मार्ग काढण्याऐवजी केंद्र सरकार दडपशाही करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आमआदमी पार्टी, कृषक समाज, लालनिशाण पक्ष, शेतकरी संघटनासह विविध संघटनेने केले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर