
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा पंचवार्षिक कालावधी एक नोव्हेंबर 2020 ला संपुष्टात आला आहे.
नगर : कोपरगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा पंचवार्षिक कालावधी एक नोव्हेंबर 2020 ला संपुष्टात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियम) अधिनियम 1963 चे कलम (15 अ) (एक) मधील (अ), (ब), (दोन), (तीन), (चार) मधील तरतुदीनुसार व वाचा क्रमांक तीन नुसार प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्याकाळ एक नोव्हेंबर 2020 पासून संपला आहे. त्यामुळे बाजार समितीचे दैनंदिन कामकाज पाहण्याकरिता प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक एन. जी. ठोंबळ यांच्या नियुक्तीचा आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी पारित केला.