स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन देण्यासाठी सरकारकडून निधी मंजुर

अशोक मुरुमकर
Tuesday, 29 September 2020

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना सप्टेंबरमधील निवृत्तीवेतन देण्यासाठी पाच कोटी २५ लाख तीन हजार ५०० रुपये मंजुर केले आहेत.

अहमदनगर : राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना सप्टेंबरमधील निवृत्तीवेतन देण्यासाठी पाच कोटी २५ लाख तीन हजार ५०० रुपये मंजुर केले आहेत. जिल्हानिहाय ही रक्कम अदा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने 2020- 21 या आर्थिक वर्षासाठी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना निवृत्तीवेतन देण्यासाठी १०५ कोटी ७७ हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी सप्टेंबर २०२० साठी पाच कोटी 25 लाख तीन हजार 500 रुपये वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी वितरीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

यानुसार मुंबई शहर 20 ला रुपये, मुंबई उपनगर 30लाख, ठाणे एक लाख नऊ हजार १०० रुपये, पालघर एक लाख 33 हजार ३२०, रायगड चार लाख 96 हजार 920, रत्नागिरी एक लाख 51 हजार 500, सिंधुदुर्ग एक लाख 27 हजार 260, नाशिक नऊ लाख ९००, जळगाव १२ लाख ९० हजार 780, अहमदनगर 18 लाख 78 हजार ६००, पुणे ३३ लाख 87 हजार 540, सोलापूर 17 लाख ३९ हजार 220 असा निधी इतर ही जिल्ह्यांना देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approved by the government to provide pensions to freedom fighters