नगर- मनमाड राज्य मार्गावर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक

Arrested for carrying pistol on Nagar Manmad state highway
Arrested for carrying pistol on Nagar Manmad state highway

कोपरगाव (अहमदनगर) : शहरातील नगर- मनमाड राज्य मार्गावर साईधाम कॉर्नरजवळ पोलिसांनी एका गाडीतून गावठी पिस्तूल, एक मॅगझिन, जिवंत काडतूस व एक मोबाईल असा पाच लाख रुपयांचा ऐवज संशयित आरोपीसह पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नामदेव रामदास बोरणारे (रा. पाटोदा, ता. येवला) असे अटक केलेल्याचे नाव आहे.


याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगरचे पोलिस कॉन्स्टेबल संतोष लोंढे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, नामदेव रामदास बोरणारे हा कारमध्ये बसून आपल्याजवळ अवैध गावठी पिस्तूल बाळगून असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सदर आरोपीला अटक केली आहे. आरोपी हे पिस्तूल विक्री करण्यासाठी या ठिकाणी थांबला होता. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपीविरोधात अवैध हत्यार बाळगणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com