हस्तिदंत विकणारे ‘वीरप्पन’ जेरबंद

पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ तपास करीत आहेत.
arrested
arrested sakal

अहमदनगर : शोभेच्या बहुमूल्य वस्तू व औषधांसाठी हस्तिदंतांची तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली. या टोळीकडून हस्तिदंत व चारचाकी वाहन जप्त केले आहे. व्यंकटेश दुरईस्वामी (वय ४०, हल्ली रा. वाकोडी फाटा, ता. नगर), महेश बाळासाहेब काटे (वय ३०, रा. आखेगाव, ता. शेवगाव), महेश भगवान मरकड (वय २६, रा. गहिले वस्ती, ता. शेवगाव), सचिन रमेश पन्हाळे (वय ३३, रा. आखेगाव, ता. शेवगाव), निशांत उमेश पन्हाळे (वय २५, रा. भगतसिंग चौक, शेवगाव), संकेश परशुराम नजन (वय २३, रा. पवार वस्ती, शेवगाव) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

स्थानिक शाखेतील पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना एक जुलै रोजी अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावरील जेऊर टोल नाका येथे दोन जण हस्तिदंतांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना कळविले. त्यानुसार पोलिसांनी जेऊर टोल नाका येथे वेशांतर करून सापळा लावून ही कारवाई केली. व्यंकटेश दुरईस्वामी (वय ४०, हल्ली रा. वाकोडी फाटा, दरेवाडी, ता. जि. अहमदनगर), महेश बाळासाहेब काटे (वय ३०, रा. आखेगाव, ता. शेवगाव), महेश भगवान मरकड (वय २६, रा. गहिले वस्ती, ता. शेवगाव), सचिन रमेश पन्हाळे (वय ३३, रा. आखेगाव, ता. शेवगाव), निशांत उमेश पन्हाळे (वय २५, रा. भगतसिंग चौक, शेवगाव), संकेत परशुराम नजन (वय २३, रा. पवार वस्ती, शेवगाव) यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ तपास करीत आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, सरकारी वकील अनिकेत आव्हाड यांनी सखोल तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने चार दिवसांची कोठडी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com