अहमदनगर : विवाहित महिलेला धमकावणारा पिस्तुलासह जेरबंद

गावठी पिस्तुलाचा धाक दाखवणारा आरोपीास कोतवाली पोलिसांनी अटक केली
Arrested with pistol threatening  married woman Ahmednagar
Arrested with pistol threatening married woman Ahmednagarsakal

अहमदनगर : विवाहित महिलेला गावठी पिस्तुलाचा धाक दाखवणारा आरोपीास कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली.

वंदना अशोक भिंगारदिवे (रा. केडगाव) या घरी स्वयंपाक करत होत्या. त्या वेळेस घरी आलेल्या व्यक्‍तीने गावठी पिस्तूल दाखवून धमकावले. तुमच्या मुलगा कोठे आहे, असे विचारून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी फिर्यादीच्या मुलाने पोलिसांना (११२ क्रमांकावर) घटनेची माहिती दिली. कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे हे स्वतः गुन्हे शोधपथकासह घटनास्थळी रवाना दाखल झाले. त्यांनी आरोपीस तत्काळ ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव-गाव विचारता त्याने गावठी पिस्तूल दुचाकीच्या डिकीत ठेवल्याचे निदर्शनास आले.

ही दुचाकी, गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे ताब्यात घेतले. कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा, मारहाण करणे, धमकाविल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे तपास करीत आहेत.

या पथकाने केली कारवाई

पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, सहायक उपनिरीक्षक सतीश भांड, पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलीम शेख, संतोष गोमसाळे, राजू शेख, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, संदीप थोरात, राजेंद्र केकाण, राजेंद्र फसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com