मूर्तीकलेच्या गावात कलेला हवा राजाश्रय; नेवासे येथील मूर्तिकारांना उद्योगवृद्धीसाठी हवे पाठबळ

Artists in Nevasa and Bhansahivare need financial support
Artists in Nevasa and Bhansahivare need financial support

नेवासे (अहमदनगर) : संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग श्री ज्ञानेश्वरी'चे निर्मिती स्थान असल्याने नेवाशाची जगभर ओळख आहे. मात्र अनेक दशकांपासून नेवासे शहर व भानसहिवरे (ता. नेवासे) या दोन गावांच्या दगडी मूर्तीकलेचा डंका महाराष्ट्रसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशात वाजत आहे.

परंतु आपल्या चार पिढ्यांपासून दगडीमूर्ती कलेची जोपासना करणार्‍या या कुशल कारागिरांना उद्योगवृद्धीसह सधनतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी राजाश्रययाची गरज आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नेवासे व भानसहिवरे येथील दगडी मूर्तीकला तशी जुनीच; परंतु गत दहा-बारा वर्षात परंपरागत पद्धतीने मूर्ती बनविण्याच्या कलेला फाटा देऊन तेथील मूर्तिकारांना बदलता काळ व मागणीनुसार आपल्या कलेला आधुनिकतेचे रुप देण्याचे काम केले आहे. दगडाला कुशलतेने जिवंतपणा देत मूर्तीची निर्मिती हा नेवासे शहर व भानसहिवरे या गावातील मूर्तिकारांच्या कलेचा गाभा, त्यामुळेच त्यांच्या कलेला उत्तर, मध्यप्रदेशासह पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातून चांगली मागणी असते.

साठ वर्षांपासून मूर्तीकलेची जोपासना करणार्‍या भानसहिवरे येथील शहात्तर वर्षीय ज्येष्ठ मूर्तीकार सुखदेव गोरे यांची दगडी मूर्ती कलेत आजोबा स्व. यशवंता, वडील (स्व) रंभाजी व आता त्यांचा मुलगा अशोक अशी चौथी तसेच नेवासे शहरातील युवा मूर्तिकार बजरंग ईरले यांचीही पिढी या उद्योगात आहे. दरदिवशी किमान आठ ते दहा मजूर रात्रंदिवस मेहनत करून सुबक अशा दगडी मूर्तींना आकार देतात. मात्र महागाईच्या काळात त्यांच्या व मजुरांच्या मेहनतीला म्हणावा तसा मोबदला मिळत नाही. 

देव-देवतांच्या मूर्ती किमान एक ते साठहजारापर्यंतची विक्री किंमत त्यांच्याकडून ठेवली जाते; परंतु केवळ व्यावसायिकता न जपता कलेची कदर करणार्‍यांना कमी अधिक रकमेत मागणीनुसार मूर्ती बनविण्यात या सुखदेव गोरे व त्यांचा मुलगा अशोक गोरे यांचे कसब वाखाणण्याजोगेच आहे. नेवासे शहरासह भानसहिवरे मूर्तिकलेची परंपरा गेल्या तीन-चार पिढ्यांपासून मेहनतीने जपण्याचे काम करताहेत. 

उदरनिर्वाह भागवितांना होते परवड
नेवासे तालुक्यात दगडी मुर्तीकलानिर्मीतीची कला जोपासण्याचे काम मुर्तीकार जोमाने करीत असले तरी त्यांना शासनाचा मात्र कुठलाही आधार मिळत नाही. एका मुर्तीकाराला किमान दहा ते बारा लाख रुपयाची गुंतवणूक खासगी उसणवारीतून करावी लागते. त्यामुळे उद्योगातूनच आपला उदरनिर्वाह भागवितांना त्यांची चांगलीच परवड होते. तालुक्यात भानसहिवरे येथे आठ तर नेवाशात पाच ठिकाणी मूर्ती बनविण्याचे उद्योग चालत असून यातून सुमारे साडेतीनशे ते चारशेजणांना रोजगार मिळतो. 

"शासनाने आम्हा मूर्तिकारांना व्यवसायासाठी आर्थिक व कलाकुसरीसाठी लागणारे आधुनिक साहित्य द्यावे करावी.
- बजरंग ईरले, दगडी मूर्तिकार, नेवासे

दगडी मूर्तीकलेत आमची चौथी पिढी ही कला जोपासतोय. त्यामुळे या उद्योगातील अनेक उतारचढाव पाहिले. उद्योगासाठी दरवर्षी खासगीतून उचल करुन कलेची जोपसना व उदनिर्वाह करणे जिकरीचेच आहे. त्यामुळे शासनाने कलेची जोपासना व्हावी म्हणून आर्थिक सहकार्याचा हात देण्याची गरज आहे.
- अशोक गोरे व दगडी मूर्तीकार, भानसहिवरे
 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com