esakal | रयतच्या समन्वय समिती सदस्यपदी अशोक बाबर
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Babar as a member of Rayat's Coordinating Committee

रयत शिक्षण संस्थेमध्ये शनिवारी (दि. 3) झालेल्या बैठकीत आमदार रोहित पवार, संस्थेचे व्हाईस चेअरमन ऍड. भागीरथ शिंदे तसेच मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या हस्ते अशोक बाबर यांचा सत्कार करण्यात आला.

रयतच्या समन्वय समिती सदस्यपदी अशोक बाबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समिती सदस्यपदी अशोक बाबर यांची नुकतीच निवड करण्यात आली. बाबर हे जनरल बॉडी सदस्य म्हणून या आधी संस्थेत काम पाहत होते. संस्थेसाठी त्यांनी केलेल्या उत्तम कार्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्‍वासातील कार्यकर्ते म्हणून बाबर यांची ओळख आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये शनिवारी (दि. 3) झालेल्या बैठकीत आमदार रोहित पवार, संस्थेचे व्हाईस चेअरमन ऍड. भागीरथ शिंदे तसेच मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या हस्ते अशोक बाबर यांचा सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमात रोहित पवार यांचाही सत्कार व्हाईस चेअरमन ऍड. भागीरथ शिंदे यांनी केला. यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, डॉ. भाऊसाहेब कराळे, निमंत्रित सदस्य अरुण कडू पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राजेंद्र फाळके, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाळासाहेब बोठे, निरीक्षक तुकाराम कन्हेरकर आदि उपस्थित होते.

निवडीबद्दल बाबर यांचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांनी अभिनंदन केले आहे. 
यावेळी बोलताना बाबर म्हणाले, रयत शिक्षण संस्था ही प्रतिष्ठित संस्था आहे. संस्थेसाठी आतापर्यंत आपण मनापासून कार्य केले आहे. यापुढेही संस्थेच्या प्रगतीसाठी आपण काम करणार आहोत. 

संपादन - अशोक निंबाळकर