esakal | कोविड सेंटरच्या माध्यमातून जपली पारनेकरांनी माणसुकी
sakal

बोलून बातमी शोधा

Assistance to Covid Center at Karjule Harya in Parner taluka

पारनेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक रूग्ण येथे उपचार घेण्यासाठी दाखल होत आहेत. येथील कोवीड सेंटरची व्यवस्था आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

कोविड सेंटरच्या माध्यमातून जपली पारनेकरांनी माणसुकी

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक रूग्ण येथे उपचार घेण्यासाठी दाखल होत आहेत. येथील कोवीड सेंटरची व्यवस्था आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे. शरदचंद्र पवार कोविड सेंटरच्या माध्यमातून पारनेरकरांनी माणसुकी जपली आहे. सेंटरचे काम इतरांसाठी उल्लेखनीय असल्याचे मत पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांनी व्यक्त केले.

कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना लोकसहभागातून जेवन देण्यात आले. त्यावेळी झावरे बोलत होते. यावेळी मारूती रेपाळे, महेश शिरोळे, विशाल झावरे, किरण ठुबे, गणेश झावरे, बाळासाहेब खिलारी, अंकुश पायमोडे, जालिंदर वाबळे उपस्थित होते.

झावरे म्हणाले, पारनेरकर नेहमीच सामाजिक कामात पुढे असतात. कोविड सेंटरला देखील रोज वाढदिवस अथवा इतर कारणास्तव तालुक्यातील अनेक गावातील दानदुर नागरीक जेवन देत आहेत हे आदर्शवत काम आहे. येथे रोज तालुक्यातील अनेक गावांमधील प्रतिष्ठानचे सदस्य टप्प्याटप्याने स्वयंसेवकाचे काम करत आहेत. हल्ली कोविड सेंटर काम करण्यास बरेच लोक नकार देतात येथे मात्र नंबर लागले आहेत ही भूषणावह बाब आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image