रस्त्यासाठी आश्वी येथे 2 कोटी 21 लाख मंजूर

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे दोन कोटी 21 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
Road images
Road imagesImages By Google

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील आश्वी महसूल मंडळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विकसित होणाऱ्या तीन रस्त्यांच्या कामासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे दोन कोटी 21 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

शासन निर्णयाप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तालुक्‍याच्या पूर्व भागातील झरेकाठी ते सातपीरबाबा या एक किमीच्या रस्त्याकरीता 73 लाख 61 हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे.

तसेच, कनोली ते वाबळे वस्तीपर्यंतच्या रस्त्याला 74 लाख रुपये, तर खळी ते कांगणवाडी रस्त्यालाही 73 लाख 65 हजारांचा निधी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाल्याने, या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

तालुक्‍यातील या गावांचा समावेश शिर्डी मतदारसंघात झाल्यानंतर आमदार विखे पाटील यांनी प्राधान्याने रस्तेविकासाला निधी उपलब्ध करून देत, रस्त्यांची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली. या विकसित मार्गामुळे या भागातील दळणवळणालाही गती मिळाली. या रस्त्याचा दैनंदिन उपयोग करणारे शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांची यामुळे मोठी सोय होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com