esakal | अश्‍लिल चाळे करणाऱ्या प्राचार्यांविरोधात विनयभंगासह ॲट्रॉसिटी दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Atrocities FIR the principal for making obscene

संगमनेरातील एका नामांकित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनिशी अश्लिल चाळे करणाऱ्या प्राचार्याविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह अँट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अश्‍लिल चाळे करणाऱ्या प्राचार्यांविरोधात विनयभंगासह ॲट्रॉसिटी दाखल

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेरातील एका नामांकित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनिशी अश्लिल चाळे करणाऱ्या प्राचार्याविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह अँट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

या प्रकऱणी पिडीत मुलीच्या विनंतीवरुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मैदानात उतरला असून, या प्रकरणाची दखल महावि्यालयाच्या व्यवस्थापनाने वेळेवर न घेतल्याने, यात व्यवस्थापन व संस्थाचालक जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. या बाबत प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, बीड जिल्ह्यातून संगमनेरातील एका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा प्राचार्य आरशु पटेल याने शारिरीक व मानसिक त्रास दिला होता. 

याप्रकरणी 13 ऑक्टोबर 2020 रोजी शहर पोलिस ठाण्यात विनयभंग व अँट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व प्रकाराबाबत पिडीत मुलीने सहा महिन्यांपूर्वी व्यवस्थापन समितीला कल्पना दिली होती. मात्र त्याच्यावर काहीच कारवाई न झाल्याने त्याची हिंमत वाढली होती. याप्रकरणी संस्थाचालक व व्यवस्थापनाने आरोपी प्राचार्याला पाठीशी घातल्याचा व गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. 

संस्थापक व व्यवस्थापन समितीला जबाबदार धरुन, संस्थेच्या मान्यता व परवाने रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, अनिता जाधव, श्रावण वाघमारे, भिमराज बागुल, अशोक खरात आदींसह 32 जणांच्या सह्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर