नेवाशात नाजूक कारणातून मुलीवर हल्ला... आरोपी निघाला घरचाच

Attack on a minor girl in Nevasa
Attack on a minor girl in Nevasa

नेवासे : गिडेगाव (ता. नेवासे) येथे घरात एकटीच असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर शनिवारी (ता. २७) झालेल्या खुनी हल्ल्ला प्रकरणात घरचाच माणूस निघाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नेवासे न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान हल्ल्याचे कारण अजून गुलदस्त्यात अाहे. तरीही या प्रकरणात नाजूक कारण असल्याची चर्चा आहे.  

तालुक्यातील गिडेगाव येथे एका वस्तीवर एकटीच असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर शनिवार (ता. २७) जून रोजी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती.

या वेळी मुलीने आरडाओरड केल्याने बाजुच्या शेतात असलेल्या तिच्या नातेवाईकाने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.

घटनेची माहिती समजताच शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलिस निरिक्षक रणजीत डेरे, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी जखमी मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी जखमी मुलीच्या जबाबावरून नेवासे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. 

पोलिसांनी या प्रकरणी सर्वबाजूंनी कसून चौकशी केली.  मात्र आरोपीचा सुगावा लागेना. दरम्यान शनिवार (ता. ११) रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी गिडेगाव येथे जाऊन घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. यावेळी जखमी मुलीच्या आईने मुलीवर तिच्या चुलत्यानेच खूनी हल्ला केल्याचा जबाब पोलिसांना दिला.  

पोलिसांनी या प्रकरणी त्यास  खुनाच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक केली. आरोपीस आज नेवासे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास (ता. १६) जुलैपर्यंत पोलीस कस्टडी दिली. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com