बांबूमुळे सुसह्य झाले आदिवासी महिलांचं जीणं

Bamboo provides employment to tribal women
Bamboo provides employment to tribal women

अकोले : शासनाच्या सामूहिक जमीन हक्क कायद्यानुसार, जिल्ह्यातील सर्वांत शेवटच्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या कुमशेतच्या ग्रामसभेला सामूहिक वनहक्क मिळाला. यामुळे येथील ग्रामस्थांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. त्यामुळे गावातील आदिवासी महिलांनी एकत्र येत बचतगटामार्फत बांबू उद्योग सुरू केला आहे. त्यातून येथील महिलांची रोजगारासाठीची वणवण थांबली. 

लोकपंचायत संस्था यासाठी प्रयत्नशील आहे. कुमशेतचे सरपंच सयाजी अस्वले म्हणाले, की नगर आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवरील कोकणकड्याजवळ असलेले कुमशेत हे आदिवासी गाव आहे. येथील नागरिकांना हक्काची जमीन मिळाली आहे.

येथील लोकपंचायत संस्थेच्या माध्यमातून शासनदरबारी लढा देऊन वन विभागाच्या ताब्यात असलेली 463 हेक्‍टर जमीन ग्रामसभेला मिळाली. या जमिनीवर ग्रामसभेच्या मान्यतेने आदिवासी नागरिकांनी बांबूची लागवड केली. आदिवासी भागात उद्योगवाढीसाठी अनेक संधी असून, शासनाने मदत केली तर अशा व्यवसायांना चालना मिळू शकते. 

हनुमंत उबाळे म्हणाले, की अकोले तालुक्‍यातील 15 आदिवासी गावांना या सामूहिक वनहक्कामधून 3200 हेक्‍टर जमीन मिळाली. यासाठी लोकपंचायत संस्थेने आदिवासी बांधवांच्या बाजूने लढा दिला. वैयक्तिक जमीन हक्क अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे.

सह्याद्रीच्या कुशीत असलेले कुमशेत निसर्गाचे वरदानच म्हणावे लागेल. जंगलात जाऊन हिरडा, बेहडा गोळा करणाऱ्या आदिवासी महिला बांबूच्या साह्याने विविध जीवनोपयोगी वस्तू बनवीत आहेत. यातून त्यांच्या कुटुंबांना आधार मिळतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com