राळेगणसिद्धीत मोहाळाचा वऱ्हाडावर हल्ला, पाचजण जखमी

Bee attack at Ralegan Siddhi
Bee attack at Ralegan Siddhi

पारनेर ः राळेगणसिद्धी येथे पद्मावती मंदीर परीसरात लग्नाच्या व-हाडावर मधमाशांनी हल्ला केला. त्यात फोटोग्राफरसह पाचजण जखमी झाले. यात तीन पुरूष व दोन लहान मुलींचा समावेश आहे. लग्न लागल्यानंतर लोक पंक्तीला जेवणासाठी बसले असतानाच हा हल्ला झाला. या वेळी व-हाडी मंडळीची मोठ्या प्रमाणात पळपळ झाली.

या बाबत माहिती अशी की, आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राळेगणसिद्धी येथे कोहकडीचा नवरदेव लग्नासाठी आला होता. व-हाडी मंडळीही नियमाप्रमाणे कमीच होती. वेळेवर लग्नही लागले. लग्नविधी पार पडल्यानंतर लोक सुग्रास भोजनावर ताव मारत असतानाच अचानक मधमाशा उठल्या.

त्यांनी वऱ्हाडी मंडळीवर हल्ला केला. एकाएकी झालेल्या हल्ल्यामुळे ते सैरभर झाले. या मधमाशांनी तीन पुरूष व दोन छोट्या मुलींवर हा हल्ला केला. या मधमाशांच्या हल्यात फोटोग्राफरचाही समावेश आहे. 

हल्ला झाल्यानंतर लोक पळू लागले. मात्र थोड्या वेळाने हल्ला थांबला. सगळे काही व्यवस्थी झाले. मात्र या पाच जणांना मधमाशांनी चांगलेच जखमी केले. त्यांना गावातीलच दवाखान्यात  उपचारासाठी नेले. तेथे मधमाशांचे काटे काढण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. 

या लग्नात मुलगा कोहकडीचा तर मुलगी राळेगणसिद्धी येथीलच होती. यात राळेगणसिद्धीचेही व-हाडी होते. मात्र तरीही या मधमाशांच्या हल्यात राळेगणसिद्धीचा एकही व-हाडी जखमी झाला नाही, याची गावात चर्चा होती. 

आर.आर. आबांच्या भाषणावेळीही घडले होते... 

या पूर्वीही एकदा राळेगणसिद्धी येथे ग्रामदिन साजरा होत असताना ( कै.) आर.आर. पाटील यांची जाहीर सभा होती. ते बोलत असताना अचानक मधमाशांचा पोळ   उठल्या. लोक घाबरून गेले. मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकांना सांगितले. घाबरू नका फक्त तुम्ही जाग्यावर शांत बसा. त्या काही करणार नाहीत. त्या वेळी सगळे लोक शांत बसले अन वैशिष्ट्य  म्हणजे एकाही मधमाशींने  कोणालाही चावा न घेता त्या मधमाशा शांत झाल्या.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com