आमदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीने तरुणांचे उपोषण मागे

मार्तंड बुचुडे
Friday, 27 November 2020

सुपे येथे नव्याने विस्तारीत होत असलेल्या म्हसणे फाटा येथील मायडिया कॅरियर कारखानदार आम्हाला काम देत नाहीत.

पारनेर (अहमदनगर) : सुपे येथे नव्याने विस्तारीत होत असलेल्या म्हसणे फाटा येथील मायडिया कॅरियर कारखानदार आम्हाला काम देत नाहीत. त्यामुळे या कंपनीच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्रांनी सुरू केलेले उपोषण आमदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. पुढील काळात कंपनीतील सर्व ठेकेदारीची कामे स्थानिक तरूणांना देण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाच्या वतीने दिले.

आमच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे मायडिया कंपणीत आम्हाला नौकरी तसेच ठेकेदारीची कामे द्यावीत या मागणीसाठी सोमवारपासून (ता. 23) चार दिवस अविनाश गाडीलकर, अशोक गाडीलकर, विनायक रासकर, प्रमोद गाडीलकर, येथील शेतऱ्यांच्या जमिनी आहेत. मुळात पारनेर हा दुष्काळी तालुका आहे. म्हणून या तालुक्यात एमआयडीसी ऊभारून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच त्या परीसराचा विकास व्हावा हा असतो. 

स्थानिकांचा आर्थिक विकास करणे हा आहे. मात्र जर स्थानिकांना नौक-या किंवा कामे मिळत नसतील तर ज्यांच्या जमिनी गेल्या ज्यांनी आमआयडीसीसाठी योगदान दिले त्यांना त्याचा काय उपयोग त्या पेक्षा एमआयडीसी त आमच्या जमिनी गेल्या नाहीत तर किमान आम्ही आमच्या जमिनीत तरी कष्ट करूण पोट भरू अशा भावना या उपोषण कर्त्यांनी व्यक्त केल्या.

भ्रष्ट अधिकारी व एमआयडीसीतील व्यवस्थापण या मुळे स्थानिकांना नेहमीच डावलले जात आहे. त्या मुळे स्थानिक तरूणांमध्ये नाराजी पसरली आहे. या नाराजीतूनच स्थानिक तरूणांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते.

सोमवारी सुरू झालेल्या उपोषणास विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. 
दरम्यान लंके यांनी काल गुरूवारी (ता. 26 ) रात्री उशीरा उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली व कंपनी व्यवस्थापणास बोलावून ठेकेदारी तसेच नौक-या देण्याची सुचना करत मध्यस्थी केली. या वेळी तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले उपस्थीत होतेत्या नंतर लंके यांच्या हस्ते या तरूणांनी उपोषण सोडले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Behind the youth hunger strike mediated by MLA Nilesh Lanka