शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर तर उपाध्यक्षपदी विकास बानकर यांची निवड

विनायक दरंदले
Friday, 8 January 2021

माजी सरचिटणीस दिपक दरंदले यांनी बोलविलेल्या बैठकीत अध्यक्ष बानकर यांच्या नावाची सुचना अप्पासाहेब शेटे यांनी केली. त्यास विकास बानकर यांनी अनुमोदन दिले.

सोनई (अहमदनगर) : शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवत सोपान बानकर यांची तर उपाध्यक्षपदी विकास नानासाहेब बानकर यांची निवड करण्यात आली आहे.

मागील महिन्यात नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी सर्व ८४ अर्जदारांच्या मुलाखती घेवून २३ डिसेंबर रोजी ११ नवीन विश्वस्तांची निवड जाहीर केली होती. यात दरंदले आडनावाचे तीन तर शेटे व बानकर आडनावाचे दोन व इतर आडनावाचे चार रहिवासी विश्वस्त निवडण्यात आले होते. प्रा.दरंदले, भागवत बानकर व अप्पासाहेब शेटेंच्या नावाची चर्चा होती.

माजी सरचिटणीस दिपक दरंदले यांनी बोलविलेल्या बैठकीत अध्यक्ष बानकर यांच्या नावाची सुचना अप्पासाहेब शेटे यांनी केली. त्यास विकास बानकर यांनी अनुमोदन दिले. इतर पदाधिकारी याप्रमाणे कोषाध्यक्ष दिपक दादासाहेब दरंदले, सरचिटणीस बाळासाहेब बोरुडे, चिटणीस अप्पासाहेब शेटे, नुतन    पदाधिका-यांचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhagwat sopan bankar has been elected as the president of shaneeshwar devasthan trust and vikas nanasaheb bankar has been elected as the vice president