भुईकोट किल्ला सुशोभीकरणात नागरिकांची मते जाणून घेणार; जगताप

आमदार जगताप; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
Bhuikot Fort Sangram Jagtap
Bhuikot Fort Sangram Jagtapsakal

अहमदनगर : जिल्ह्याचे महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी आलेल्या निधीतून कसे कामे करायचे, याबाबत नागरिकांचाही सहभाग वाढविणार आहे. लोकांची मते जाणून घेणार, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

सुशोभीकरणाबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. किल्ला सुशोभीकरण करण्यासाठी नगरकरांची मते जाणून घेण्याचा निर्णय झाला. या वेळी महापालिका आयुक्त शंकर गोरे, बांधकाम विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार, जिल्हा नियोजन समिती अधिकारी नीलेश भदाणे, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, संतोष यादव, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, की भुईकोट किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा नगर शहराला लाभलेला आहे या किल्ल्याचे सुशोभीकरण व्हावे व पर्यटनासाठी हा किल्ला खुला करावा, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी प्राप्त झाला आहे. या माध्यमातून अहमदनगरचा इतिहास देशासमोर येईल, लवकरच भुईकोट किल्ला परिसराची पाहणी करून सुशोभीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी नगरकरांनी लवकरात लवकर आपल्या सूचना मांडाव्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com