किलबिल किलबिल पक्षी बोलती...राष्ट्रीय हरित सेनेतर्फे पक्षीगणना; खंड्या, मोरांची संख्या वाढली

A bird count was conducted by the national green army on the premises of the agricultural university.jpg
A bird count was conducted by the national green army on the premises of the agricultural university.jpg

राहुरी (अहमदनगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेतर्फे कृषी विद्यापीठ परिसरात पक्षीगणना करण्यात आली. तीन किमी चौरस प्रक्षेत्रात तीन शिक्षक व 65 विद्यार्थ्यांनी पक्षीगणनेत भाग घेतला. त्यात यंदा खंड्या (किंगफिशर) व मोरांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसली, तर साळुंकी, कावळे, चिमणी व बुलबुल यांची संख्या तुलनेने कमी होताना दिसत आहे.

मालमत्तांना टाळे! शेवगाव पालिकेकडून थकीत करवसुलीसाठी कारवाई सुरू
 
मागील सात वर्षांपासून हरित सेनेचे सचिव बाळासाहेब डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षीगणना केली जाते. शिक्षक अरुण तुपविहिरे, गौतम गायकवाड, विद्यार्थी हर्ष तुपविहिरे, ऋतुराज गायकवाड, संस्कार मेटकर, वेदिका सातपुते, खुशी चुत्तर, कौस्तुभ मुठे, अथर्व शिंदे, समीक्षा नाईक, वैष्णवी नवले, ऋतुजा काचोळे, राहुल पठारे, प्रणव बन, अविष्कार भोरे, राज दौंड यांनी पक्षीगणनेत भाग घेतला. मुख्याध्यापिका आशा धनवटे, उपमुख्याध्यापक नंदकुमार मुळे, पर्यवेक्षक नबाजी रहाणे, प्रशासक जितेंद्र मेटकर व संस्थेचे सचिव डॉ. राजेंद वाघ यांनी त्यांना सहकार्य केले. 

दरवर्षी ठरलेल्या भागात गणना केली जाते. 12 गटांत पाच-सहा सदस्य व एका गटप्रमुखामार्फत सकाळी पावणे सात ते आठ वाजेपर्यंत एकाच वेळी गणना सुरू होते व थांबविली जाते. पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांना वर्गात अगोदर स्क्रीनवर गणना करण्याच्या भागाची माहिती, गणना करण्याची पद्धत सांगण्यात येते. महाराष्ट्रात आढळणाऱ्या पक्षांची सचित्र ओळख करून, छापील रंगीत प्रिंट किंवा मोबाईलमध्ये फोटो दिला जातो. गटातील सदस्य गटप्रमुखाला नोंदणीसाठी, पक्षी ओळखण्यासाठी मदत करतात. दुर्बिण, कॅमेरा व पक्षाची चित्रे यांद्वारे गणना होते. 

नगर-मनमाड रस्त्याजवळ मुळा उजव्या कालव्यापासून पूर्व व पश्‍चिमेकडे, उद्यान विद्या विभाग, सडे रस्ता, धन्वंतरी विभाग, शेडगे वस्ती, धरमाडी टेकडी, विद्यापीठ वसाहत परिसर व विद्यालय परिसरात 12 ठिकाणी गणना झाली. स्थलांतर, अतिवृष्टी व शिकारी पक्षी यांमुळे पक्षी संख्येवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. 

पक्षीनिहाय संख्या  

मोर  64 
पोपट 222 
भारद्वाज 80 
चिमणी 328 
कावळे 218 
बगळे 302 
बुलबुल 134 
खंड्या 47 
साळुंकी 143 
होला 128 

एकूण पक्षी गणना : 2476
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com