महापालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवार देणार

BJP will field candidates in municipal elections
BJP will field candidates in municipal elections

नगर ः महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अविनाश घुले यांच्या वर्णीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची तर भाजप नेत्यांची शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या घरी बैठक झाली. बैठकीनंतर गंधे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी भाजप उमेदवार देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. 

महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व बसपची सत्ता आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक चार मार्चला होणार आहे. हे पद राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुले यांनाच मिळावे, यासाठी आमदार संग्राम जगताप प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आज सायंकाळी चारच्या सुमारास गंधे यांच्या घरी बैठक घेतली. 

भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, महेंद्र गंधे, संजय ढोणे उपस्थित होते. गंधे म्हणाले, ""भाजपकडे तीन उमेदवार आहेत. मनधरणीसाठी आमदार संग्राम जगताप व भाजपचे नेते आले होते; मात्र भाजप सभापतिपदाचा दावा सोडणार नाही.'' यामुळे आता अविनाश घुले यांचा सभापतिपदाचा मार्ग सोपा राहिलेला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com