3 पक्षीय रिक्षा पंक्चर करू; पंढरपूर पॅटर्न राबवू - बावनकुळे

chandrakant bavankule
chandrakant bavankuleesakal

अहमदनगर : आगामी २०२४ च्या निवडणुकांची तयारी आम्ही सुरू केली आहे. उद्या जरी निवडणुका लागल्या, तरी पंढरपूर पॅटर्नप्रमाणे आम्हीच बाजी मारू व या तीन पक्षीय ऑटो रिक्षाला पंक्‍चर करू, असा दावा भाजपचे सरचिटणीस तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर येथे केला. ‘‘राज्यात जानेवारी २०२२ नंतर ८५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यात ओबीसींना संधी द्यायची नाही, असे राज्य सरकारने ठरवले आहे,’’ असा आरोप (ता.२५) बावनकुळे यांनी केला आहे. (BJP-will-take-action-for-OBC-Warning-of-Chandrasekhar-Bavankule-jpd93)

ओबीसीं’साठी भाजप रस्त्यावर उतरेल

बावनकुळे म्हणाले, राज्यत भाजपची सत्ता असताना ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याचा अध्यादेश काढला होता. त्याची मुदत संपण्यापूर्वी पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेटून मुदतवाढ करण्याचे सुचविले. मात्र महाविकास आघाडीतील झारीतील शुक्राचाऱ्यांना ओबीसी आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता केला. राज्य सरकारला जनगणना करायची नाही, तर फक्त डेटा द्यायचा आहे. गावागावांच्या रजिस्टरमधून एससी, एसटी, ओबीसी व खुले, अशी नावे स्वतंत्र करून त्याचा डेटा न्यायालयाला द्यायचा आहे. यासाठी पाहिजे ती मदत भाजप द्यायला तयार आहे. एका गावातील अशी माहिती आम्ही दोन दिवसांत तयार केली आहे. त्यामुळे पाच महिन्यांत सरकारला राज्याची अशी माहिती जमवणे सहज शक्‍य आहे, असे त्यांनी शेवटी म्हटले. तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. मंत्र्यांना गावा-गावांतून येऊ दिले जाणार नाही, असाही इशारा यावेळी बावनकुळे यांनी दिला आहे.

माजी मंत्री बावनकुळे यांनी नगरला पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, शिवाजी कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन तांबे आदींसह उपस्थित होते.

chandrakant bavankule
महारेल दोन प्रमुख महानगरांना जोडणार! 'या' तीन जिल्ह्यातून जाणार
chandrakant bavankule
जनावरांसाठीही सोशल मीडियावर बोली! ऑनलाइन बाजार सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com