कांदा बियाण्याचा काळाबाजार ः बोगस बियाण्याची शेतकऱ्यांना विक्री

Black market of onion seeds: Sale of bogus seeds to farmers
Black market of onion seeds: Sale of bogus seeds to farmers

श्रीगोंदे : बोगस कांदाबियाण्याची साठवणूक करणे, परस्पर खासगी कंपनीच्या बॉक्‍समध्ये "सील'बंद करून विक्रीसाठी खासगी विक्रेते व शेतकऱ्यांना वितरित केल्याप्रकरणी मांडवगण (ता. श्रीगोंदे) येथून श्रीगोंदे पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. अमोल प्रकाश धबागडे (मूळ रा. यवतमाळ, हल्ली मांडवगण), असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के म्हणाले, की कृषी विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकाने मांडवगण येथे छापा घातला. विराट ऍग्रो इनपुट, जालना या कंपनीच्या नावे असलेल्या कांदाबियाण्याचे 500 ग्रॅमचे 80 बॉक्‍स, 70 किलो सुटे कांदाबियाणे, सीलिंग मशिन, प्लॅस्टिकच्या रिकाम्या पिशव्या, असा अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

बियाणे अधिनियम, 1966 आणि बियाणे नियंत्रण आदेश, 1983 या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात नगरच्या कृषी विभागास यश आले. संबंधित बियाण्याचा नमुना पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविला आहे. कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी, मोहीम अधिकारी राजेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

याबाबत राजेश जानकर म्हणाले, की शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे बियाणे हे अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे. तसेच, खरेदीच्या वेळी न विसरता त्याचे परिपूर्ण बिल घ्यावे.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com