हे दान केल्याने वाचले 26 हजार जणांचे प्राण 

Blood donation saved over 26,000 lives
Blood donation saved over 26,000 lives

नेवासे : नगर जिल्हा रुग्णालयाने रक्तदात्यांप्रती केलेली जनजागृती व या माध्यमातून जिल्हा रुग्णालय रक्तपेढीद्वारे गेल्या पाच वर्षांत (2015 ते 19) रक्तपुरवठा वेळेवर करून तब्बल 26 हजार 602 रुग्णांचे प्राण वाचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. 

आधुनिक युगात वैज्ञानिक आविष्काराने अनेक असाध्य बाबी साध्य करून दाखविल्या; परंतु आजवर कुणीच कृत्रिम पद्धतीने रक्ताची निर्मिती करू शकले नाही. त्यामुळेच अपघात, आजारामुळे किंवा छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करताना कुणाला रक्ताची गरज भासल्यास ते दुसऱ्या कुण्या व्यक्तीकडूनच घ्यावे लागते. म्हणूनच तर रक्तदानाला विशेष महत्त्व आहे. 

जिल्हा रुग्णालय रक्तपेढीत सन 2015 मध्ये तीन हजार 673 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याद्वारे सुमारे 4 हजार रुग्णांचा जीव वाचू शकला. 2016 मध्ये 4 हजार 133 जणांनी रक्तदान केले. त्याचा 5 हजार 300 जणांना पुरवठा करण्यात आला. 2017 मध्ये 4 हजार 573 जणांनी रक्तदान केले आणि 5 हजार 500 रुग्णांना पुरवठा करण्यात आला. 

रक्तदान कोण करू शकतो? 
- 18 ते 65 वर्षे वयोगटातील 
- कुठलीही सुदृढ व्यक्ती रक्तदान करू शकते. 
- रक्तदानासाठी तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा. 
- 45 किलोपेक्षा अधिक वजन असणारी कुठलीही व्यक्ती रक्तदान करू शकते. 

रक्तदान कोण करू शकत नाही? 
- आजारी आणि अशक्त व्यक्ती 
- एचआयव्हीबाधित अथवा रक्ताची कावीळ झालेली व्यक्ती. 
- गरोदर स्त्रिया. 
- मलेरिया, टीबी यांसारख्या संसर्गजन्य आजाराने बाधित व्यक्ती. 
- मधुमेह, रक्तदाब यांसारखे विकार जडलेल्या व्यक्ती 

जागतिक रक्तदाता दिन विशेष 
डॉ. कार्ल लॅडस्टेनर (ऑस्ट्रेलिया) यांनी साधारणत: 127 वर्षांपूर्वी मानवी रक्तगटाचा शोध लावला. तोच दिवस (ता. 14 जून) जागतिक आरोग्य संघटनेकडून "जागतिक रक्तदाता दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो.  

 रक्तदान करताना सर्वांत आधी रक्तदात्याची शारीरिक तपासणी केली जाते. घेतलेल्या रक्ताची घनता व त्यातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते. एका वेळी साधारणत: 350 ते 450 मिलिलिटर इतकेच रक्त घेतले जाते. यामुळे रक्तदात्यांच्या शरीरातील रक्त शुद्ध होण्यासोबतच दुसऱ्या रुग्णासाठी ही बाब जीवनदायी ठरते. 
- डॉ. सुमय्या खान, जिल्हा समन्वयक, जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, नगर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com