शेतात ट्रॅक्टरने मशागत सुरु होती, शेजारच्या उसातून येऊ लागला उग्रवास

सतीश वैजापूरकर
Wednesday, 2 December 2020

वाकडी ममदापूर शिवारात अनोळखी व्यक्तीचा कूजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

शिर्डी (अहमदनगर) : वाकडी ममदापूर शिवारात अनोळखी व्यक्तीचा कूजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.हा प्रकार हत्या, आत्महत्या की बिबटयाचा हल्ला याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या आधी साधारण तीन वर्ष पूर्वी याच परिसरात एका फळबागेत असाच एक कूजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

नांदूर रस्त्यावरील ममदापूर वाकडी शिवारात रस्त्यालगत एक शेतकरी शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करत असताना शेजारी असलेल्या उसाच्या शेतातून उग्रवास येत असल्याने या शेतात एखादा प्राणी कूजलेला आहे की ही खात्री करण्यासाठी आणखी काही शेतकरी जमा करून घटनास्थळी गेले असता त्याठिकाणी एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह कूजलेल्या अवस्थेत आढळून आला. 35 ते 40 दरम्यान वयवर्ष असलेल्या या व्यक्तीच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व खाकी कलरची पॅन्ट आहे. मृतदेह अत्यंत कूजलेला असल्यामुळे या व्यक्तीची ओळख पटविणे मुशकील आहे. या घटनेची माहिती वाकडी गावचे पोलिस पाटील मछिंद्र अभंग, सरपंच डॉ. संपतराव शेळके यांना दिली.

त्यांनी पोलिसांसोबत संपर्क साधला. त्यानंतर श्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मसुद खान पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले डॉक्टरांचे पथक बोलावून जागेवर शवविछेदन करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनीही भेट दिली. याश्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मसूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार अढांगळे करीत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of a stranger in Wakadi Mamdpur