प्रवरा नदी पात्रात बुडून दोघांचा मृत्यू

खुपटी, ता. नेवासे येथील घटना
Pravra river two youth death
Pravra river two youth deathSakal

नेवासे - दोन दिवसांपूर्वी पोहायला गेलेल्या खुपटी (ता. नेवासे) येथील दोघा तरुणांचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवारी) उघडकीस आली. दीपक प्रकाश घोरपडे (वय ३०) व प्रवीण पावलस ठुबे (वय ३०, दोघे रा. खुपटी, ता. नेवासे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, घोरवडे व ठुबे हे दोघे बुधवारी (ता. १४) खुपटी येथील महादेव मंदिर परिसरातील प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान दोघेही दोन दिवसांपासून घरी आलेच नाही. आज सकाळी त्यांचे मृतदेह नदीपात्रात तरंगतांना आढळून आले. दरम्यान, याप्रकरणी अमोल पावलस ठुबे यांनी दिलेल्या खबरीवरुन नेवासे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रेवनाथ मरकड करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com