Bribe : वाळूवाल्यांकडून हप्त घेताना अटक; आता तहसीलदारासह हस्तकाची पोलीस कोठडीत रवानगी | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accepting bribe crime

Bribe : वाळूवाल्यांकडून हप्त घेताना अटक; आता तहसीलदारासह हस्तकाची पोलीस कोठडीत रवानगी

कोपरगाव : सातत्याने वादग्रस्त ठरत असलेले येथील तहसीलदार विजय बोरुडे यांनी आपल्या हस्तकाच्या मदतीने वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई न करण्याकरिता वीस हजार रुपयांची रक्कम घेताना नाशिक लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत दोघे अडकले. त्यांच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

आज दोघांना न्यायालयात हजर केले असता जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

याबाबत अधिक महिती अशी,तक्रारदार यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी ठरलेल्या रकमेपैकी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी हस्तक

गुरमित सिंग दडीयल यांनी आरोपी बोरुडे यांच्यासाठी स्वीकारण्याचे मान्य केले होते.सदर रक्कम घेताना आरोपीस पंच, साक्षीदारांसमोर जेरबंद करण्यात आले होते.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील बोरुडे यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. तहसीलदार विजय बोरुडे यांच्याकडून अधिक चौकशी करण्यासाठी त्यांना शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये घेवून गेले होते. राञी उशिरा त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्यासह पंकज पळशीकर ,नितीन कराड,प्रवीण महाजन,प्रभाकर गवळी ,संतोष गांगुर्डे यांचा पथकात समावेश होता