esakal | १०० लोकांची वाट बंद; हंगा नदीवरील पुल पावसात गेला वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

The bridge over the Hanga River was swept away in the rain

वाघुंडे बुद्रुक येथे गावाजवळच हंगा नदीवर असलेला दिवटे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल मागील आठवड्यात झालेलेल्या मुसळधार पावसात वाहून गेला आहे. 

१०० लोकांची वाट बंद; हंगा नदीवरील पुल पावसात गेला वाहून

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : वाघुंडे बुद्रुक येथे गावाजवळच हंगा नदीवर असलेला दिवटे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल मागील आठवड्यात झालेलेल्या मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे या मळ्यात राहाणाऱ्या सुमारे शंभरहून अधिक लोकांची गावात येण्यायाची वाटच थांबली आहे. गावात तसेच सुप्याला दुध किंवा इतर माल विक्रीसाठी अणणे किंवा बाजारहाटासाठी सुप्याला येण्याची त्यांची मोठी पंचायत झाली आहे.

तालुक्यात व विशेषताः सुपे परीसरात मागीत आठवड्यात वारेमाप पाऊस झाला. त्यात हंगा नदीला गेली अनेक वर्षात आला नव्हता एवढा मोठा पूर आला होता. या पुराने मुंगशी येथील एकाचा जीवही घेताल होता. याच काळात वांघुडे बुद्रुक गावातून दिवटे मळ्यात जाणारा सुमारे चार वर्षा पुर्वी बांधण्यात आलेला हंगा नदीवरील पुलही वाहून गेला आहे. त्यामुळे दिवटे मळ्यात राहाणा-या लोकांची गावात जा-ये करण्याची मोठी अडचण झाली आहे.

त्यांना बाजारहाटासाठी किंवा इतर कामांसाठी पारनेर व सुपे किंवा इतर ठिकाण जाणे सुद्धा कठीण झाले आहे. त्या मुळे या पुलाची तातडीने दुरूस्ती करावी तसेच पुलाची उंचीही वाढवावी अशी मागणी दिवटे मळ्याती लोकांनी केली आहे. तसेच या नदीतून विद्यूत मंडळाने विज वाहून नेण्यासाठी खांब ऊभा केले आहेत. त्यातील एक खांबही पुराच्या पाण्याने पडला होता. त्यामुळे हे धोकादायक वीजवाहक खांबही नदीपात्रातून हलविण्याची गरज आहे. अन्य़था यातून मोठी दुर्घटणा घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

पुल वाहून गेल्याने दिवटे मळ्यातील लोकांची गावात येण्याची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे या पुलाची तातडीने दुरूस्ती करावी . तसेच या पुलाची उंचीही वाढविण्याची गरज आहे. पुलाची उंची अधिक असती व काम दर्जेदार झाले असते तर पुल वाहन गेला नसता, असे अनिल दिवटे म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image