
25 डिसेंबरला रात्रीचा चॉकलेट सोल्जर या चित्रपटाच्या शोला तिकीट काढून हबीब खान व रत्नम पिल्ले गेले. रात्री 11 वाजता पिल्लेंनी इशारा केला. हबीब खान यांनी बॉम्ब टाकला.
नगर ः झेंडीगेट येथील सध्या बंद असलेली दीपाली टॉकीज म्हणजे पूर्वीची सरोश टॉकीजवर 25 डिसेंबर 1942ला स्वातंत्र्याच्या आंदोलनात सरोश टॉकीजमध्ये इंग्रजांविरुद्ध आंदोलनात क्रांतिकारकांनी बॉंम्ब टाकला यामुळे इंग्रज हादरले होते.
पिल्ले म्हणाले, 1942च्या सुमारास शहरातील एका क्रांतिकारकांने पुण्यातील ऑर्डीनरी फॅक्टरी मधून बॉम्ब चोरला. तो बॉम्ब एका महिलेने पोटावर ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून बसने भिंगारला आणला. त्याचा स्फोट करण्याची जबाबदारी रत्नम पिल्ले, हबीब खान, पन्नालाल चौधरी आदींनी केली.
25 डिसेंबरला रात्रीचा चॉकलेट सोल्जर या चित्रपटाच्या शोला तिकीट काढून हबीब खान व रत्नम पिल्ले गेले. रात्री 11 वाजता पिल्लेंनी इशारा केला. हबीब खान यांनी बॉम्ब टाकला. यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी मृत्यूमुखी पडले. अनेक जखमी झाले. खान हे मिलिटरी दवाखान्यात असल्याने आलेल्या ऍम्ब्युलन्समधून हे दोघे जखमींना घेऊन दवाखान्यात गेले. पुढे ही बाब लक्षात आल्यावर इंग्रजांन दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
नगरचे स्वातंत्रसैनिक भाई सथ्था यांनी बॅरिस्टर नरिमन यांना मुंबईहुन बोलावून केस चालविण्यास सांगितले बॅरिस्टर नरिमन यांनी युक्तिवाद करताना ऐकीव गोष्टीवर खटला आहे,प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही असा युक्तिवाद केला, त्यामुळे चौघांना निर्दोष सोडण्यात आले. पण हे परत बॉम्बस्फोट करतील म्हणून त्यांना ब्रिटिशांनी तीन वर्षे विसापूर तुरुंगात डांबले. स्वातंत्र मिळाल्यावर त्याची सुटका झाली.
त्यावेळी देशाला हादरून सोडणारा हा बॉम्बस्फोट होता त्याच्या स्मरणदिन प्रशासकीय पातळीवर व्हावा व त्याच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक किंवा रस्त्याला नावे द्यावीत अशी अपेक्षा रत्नम पिल्ले यांचे वारस आर. आर. पिल्ले करत आहेत.
गेली अनेक वर्षे मागणी करूनही सरोश बॉम्बस्फोटाचे स्मारक अथवा या क्रांतिकारकांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी नगर, भिंगारमध्ये प्रयत्न होत नाहीत अशी खंत नोटरी पब्लिक भिंगार शहर कॉंग्रेस अध्यक्ष आर आर पिल्ले यांनी व्यक्त केली.