कर्जत शहरात बैलगाडा शर्यतीचा थरार

सचिन चव्हाण प्रथम, राणा ग्रुप द्वितीय; २२ लाखांचा बक्षिसांची लयलूट
bullock cart race
bullock cart race esakal

कर्जत : पहिल्या राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीत सचिन चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. माळशिरसच्या तांबोळी यांच्या राणा ग्रुपने दुसरा क्रमांक पटकावला. किशोर भिलारे यांनी तृतीय क्रमाकांचा मान मिळाला आहे. स्पर्धेत प्रथम आलेल्यांना २ लाख २२ हजार २२२ रुपये तर द्वितीय आलेल्यांना १ लाख ११ हजार १११ तर तृतीय क्रमांक आलेल्यांना ७७ हजार ७७७ रुपये व सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

गुरुवारी कर्जत शहरातील लकी हॉटेल शेजारी असलेल्या मैदानावर आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या भव्य राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार बघायला मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागातील बैलगाडी शर्यत प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेत अटीतटीची लढत पाहायला मिळाल्या. महाराष्ट्राच्या विविध भागातून पाचशेपेक्षा अधिक बैलजोडींनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. तीस हजारांहून अधिक शौकीन व नागरिक या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी व थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कर्जत शहरात आले होते. एकूण २२ लाख रुपयांची बक्षिसे या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना आमदार रोहित पवारांच्या वतीने देण्यात आली आहेत. महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच्या अंतिम स्पर्धेत एकूण ७ पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेसाठी राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अशोक पवार, आमदार अनिल पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार राजू नवघरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार संजय शिंदे, आमदार दिलीप बनकर, आमदार यशवंत माने, आमदार इंद्रनील नाईक, आमदार अतुल बेनके, आमदार ऋतुराज पाटील, आमदार झीशान सिद्दिकी, आमदार राहुल जगताप उपस्थित होतो.

परंपरा जोपासली जाईल ; रोहित पवार

बैल सजविण्याचे साहित्य विकणाऱ्यांपासून ते शर्यत आयोजित केलेल्या ठिकाणी छोटेखानी व्यवसाय करणारे व्यावसायिक यांना या माध्यमातून फायदा होत असतो. गेल्या काही वर्षांत यांत्रिकीकरणामुळे बैलांचा वापर शेतीसाठी काही प्रमाणात कमी झाल्याचेही निदर्शनास येत आहे. पण अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे शेतकरी आणि बैलाचे नाते आणखी घट्ट होईल आणि त्याला एक नवे वळण मिळेल. आपली परंपरा जोपासली जाईल हा महत्त्वाचा हेतू स्पर्धा आयोजित करण्यामागे आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com