नगर- सोलापूर मार्गावर बाभुळगावजवळ ट्रक जळून खाक

नीलेश दिवटे 
Sunday, 4 October 2020

नगर- सोलापूर मार्गावर नागलवाडी (ता. कर्जत) शिवारात आज पहाटे द बर्निग ट्रकचा थरार प्रवाशी, वाहन चालकांनी अनुभवला.

कर्जत (अहमदनगर) : नगर- सोलापूर मार्गावर नागलवाडी (ता. कर्जत) शिवारात आज पहाटे द बर्निग ट्रकचा थरार प्रवाशी, वाहन चालकांनी अनुभवला. या रस्त्याच्याकडेला करमाळ्याकडे तोंड असलेला मालवाहतूक ट्रक जळून खाक झाला आहे.

याबाबत मिरजगाव पोलिस दुरक्षेत्रासह कर्जत पोलिस अनभिज्ञ होते. या गाडीला नंबर प्लेट नसून मागे फक्त सरकार नाव आहे. यात काय माल होता, ती कुठे चालली होती, आग कशाने लागली. हा अपघात की घातपात असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नगर- सोलापूर मार्गावरील नागलवाडी गावाच्या शिवारात निमगाव गांगर्डेसह १७ गावांना पाणीपुरवठा योजनेसाठी असणाऱ्या रिकाम्या पाण्याच्या टाकीपासून साधारणतः शंभर मीटरवर मालवाहतूक ट्रक जळालेल्या अवस्थेत आढळली. ही ट्रक जळत असताना तेथे चालक व कोणीच नव्हते. सदर गाडी जाळून खाक झाली आहे. ट्रकजवळ एक स्टिलचा हंडा, बादली होती. या ट्रकमध्ये नेमके काय होते. याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burn truck near Babhulgaon on Nagar Solapur road