ॲट्रॉसिटी, विनयभंगाची खोटी फिर्याद; महिलेसह साक्षीदारांवर गुन्हा

crime
crime sakal


निघोज ( जि. अहमदनगर) :
सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी, विनयभंगाची खोटी फिर्याद देणाऱ्या फिर्यादी महिलेसह खोटी साक्ष देणाऱ्या साक्षीदारांवर आता पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच संबंधित पसार झाले आहेत. दरम्यान, फिर्यादीसह साक्षीदारांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या घटनेमुळे आता खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना चपराक बसेल.

याबाबत माहिती अशी ः पारनेर तालुक्यातील जवळे येथील एका महिलेने इतर साक्षीदारांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते घावटे यांच्याविरुद्ध चार वर्षांपूर्वी जातिवाचक शिवीगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. अहमदनगरच्या विशेष सत्र न्यायालयात हा खटला चालल्यानंतर यातील आरोपी निर्दोष असल्याचा निकाल देण्यात आला होता.
या खटल्याच्या सुनावणीवेळी फिर्यादी महिलेच्या पतीचा दारूविक्रीचा व्यवसाय परिसरात असल्याचा, तसेच आरोपींनी दारूबंदीसाठी गावात काम केल्याचे पुरावे सत्र न्यायालयात सादर केले होते. या गुन्ह्यात आरोपीला स्पष्टपणे अडकवल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. असले खोटे प्रकार वेळीच थांबावेत, भविष्यात पुन्हा असे धाडस होऊ नये म्हणून फिर्यादी व साक्षीदारांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार भादंवि कलम 182 नुसार सहायक पोलिस निरीक्षक राजेश काळे यांनी ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील मूळ फिर्यादी महिलेसह साक्षीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

crime
जिओने पुन्हा लाँच केले 5 नवे प्लॅन; वाचा काय आहेत बेनिफिट्स

दुर्मिळ घटना ....!
पोलिसांकडे जाऊन बनाव करीत, वैयक्तिक फायद्यासाठी व आकस भावनेतून अनेकदा खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्यासाठी बनावट साक्षीदारही तयार केले जातात. पुढे हे खटले निर्दोष होतात. मात्र, यामुळे सरकारचा नाहक मोठा खर्च होतो. अशा खोट्या फिर्यादी व साक्ष देणारांना या निकालामुळे काही प्रमाणात आळा बसेल. या खटल्यातील निकालामुळे फिर्यादीवर त्याच गुन्ह्यातील तपासी अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्याची वेळ येणे, ही बाब दुर्मिळ समजली जाते.

crime
टाटाच्या 'या' कार्सवर मिळतोय जबरदस्त डिस्कांउट; पाहा डिटेल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com