esakal | सोशल मीडियावर मदतीचे आवाहन; मित्रांकडून ५१ हजार जमा
sakal

बोलून बातमी शोधा

A check of Rs 51000 for assistance to a person from Nandur Pathar

कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यातील घरातील कर्ता पुरुषच बाधीत झाला तर घरातील आर्थिक घडी पुर्णपणे विस्कळीत होते.

सोशल मीडियावर मदतीचे आवाहन; मित्रांकडून ५१ हजार जमा

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यातील घरातील कर्ता पुरुषच बाधीत झाला तर घरातील आर्थिक घडी पुर्णपणे विस्कळीत होते. पारनेर तालुक्यातील नांदुर पठार येथील एक कुटुंब कोरोना बाधीत झाले. घरातील कर्त्या व्यक्तीच्या मित्रांनी परीवारास आर्थिक मदत करत ५१ हजार रूपयांचा धनादेश दिला आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सातत्याने लॉकडाऊन करण्यात येत होते. त्यावेळी सर्व स्तरातील सामाजिक संस्था ज्यांचा रोजगार बुडला त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तु पोहच करत होत्या. मात्र आता लॉकडाऊन उठले आहे. काहींचे कामे घरून तसेच कार्यालयातुन सुरू आहेत. मात्र घरामधील कर्ता पुरषच कोरोनाबाधीत झाला त्यानंतर अनुक्रमे घरातील इतर सदस्य बाधीत झाले. घरावर आर्थिक संकट आले. मात्र यावर मित्रांनी मात्र साथ सोडली नाही.

पुणे येथील आधार शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे, बाळासाहेब आग्रे यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर गावात सामाजिक काम करणाऱ्या मित्राबद्दल आसे घडले आहे. त्यास आपल्या सर्वांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर सर्व सदस्यांनी पुढाकार घेऊन दोनच दिवसात ५१ हजार रुपयांची मदत जमा केली. 

कोरोनाबाधीत मित्राच्या घरी जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करून त्यांना मदतीचा धनादेश सुपूर्द केला. कोरोनाबाधित झालेल्या या मित्राने त्यांच्या कुटुंबाला या कठीण काळात देवासारखे धावून येऊन मदत केल्याबद्दल आधार शैक्षणिक संस्थेच्या मदत केलेल्या सर्व सभासदांचे मनापासून आभार मानले. त्यांनी माहिती देताना सांगितले की त्यांच्या अगोदर त्यांचे आई वडील व भावाच्या मुलांना देखील त्यांनी वेळेत उपचार करून त्यांनी या महामारीतून सुखरूप बाहेर काढले. शिंदे यांनी आपल्या शिक्षण संस्थेला वेळोवेळी मदत करणाऱ्या आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर