कोरोनाने शिकवला मुलांना बापाचा व्यवसाय

मार्तंड बुचुडे
Saturday, 3 October 2020

शेतकऱ्यांची मुले शेतीतील सर्व कामे करू लागली आहेत. तर, व्यापारांची मुले व्यवसाय संभाळू लागली आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण बंद असले तरी मुलांना व्यावसायिक शिक्षण पक्के मिळाले आहे. 

पारनेर ः कोरोनाच्या महामारीमुळे शाळा- महाविद्यालय बंद आहेत. अनेकजण कामगार वर्क फ्रॉम होम करीत आहेत. त्यामुळे अनेकांना घरातील विविध कामे शिकण्याची आयती संधी मिळाली. शाळा बंद असल्याने मुलांना वडिलोपार्जीत व्यवसाय शिकण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाचे जसे संकट आहे. तसेच, उद्योगव्यवसाय शिकण्याची नामी संधी सुद्धा मिळाली आहे. 

गेल्या सहा महिन्यांपासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक दिवस राज्यात लॉकडाऊन होते. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाले असले तरीही लोकांचे जनजीवन अद्यापही सुरळीत झाले नाही. शाळा-कॉलेज बंद आहेत. विविध व्यवसाय सुद्धा कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत.

सरकारी तसेच खासगी कार्यालयातही कमी अधिक प्रमाणातच नियमानुसार उपस्थिती आहे. काही ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे अनेक जण अद्यापही घरीच आहेत. त्याच परिणाम बहुतेक जणांना घरी भरपूर वेळ मिळत आहे. 

त्यामुळे अनेकांनी आपले घरगुती पारंपरिक वडिलोपार्जीत व्यवसायात लक्ष घातले आहे. तसेच, शाळा बंद असल्याने मुले घरीच आहेत. त्यांनाही वडिलोपार्जीत व्यवसायात गोडी वाटू लागली आहे. त्यांच्यावर हळूहळू वयोमान व कुवतीनुसार जबाबदारी टाकत आहेत.

मुली घरात हळूहळू घरात आई मोठी बहीण, वहिनी यांच्या सोबत घरगुती कामात मदत करत आहेत. वडिलधारी मंडळीही आता मुलांवर जबाबदारी टाकत आहेत. 

व्यावसायिक ज्ञानात परांगत 
शेतकऱ्यांची मुले शेतीतील सर्व कामे करू लागली आहेत. तर, व्यापारांची मुले व्यवसाय संभाळू लागली आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण बंद असले तरी मुलांना व्यावसायिक शिक्षण पक्के मिळाले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The children learned the father's business