
सोनई येथील विनीयर्ड प्रार्थनास्थळात गुरुवारच्या रात्री मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
सोनई (अहमदनगर) : सोनईसह घोडेगाव, वडाळाबहिरोबा, चांदे व परिसरात ख्रिस्त बांधवांनी कोरोना संसर्गाची काळजी घेत अतिशय साध्या पद्धतीने नाताळ सण साजरा केला.
सोनई येथील विनीयर्ड प्रार्थनास्थळात गुरुवारच्या रात्री मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम झाले. फादर शैला व सुनिल गंगावणे यांनी प्रभू येशूची आराधना करुन पवित्र संदेश वाचून दाखविला. सोनईचे सरपंच संगिता वैरागर सह भक्त यावेळी उपस्थित होते. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले.
वडाळाबहिरोबा येथील फेयर बॅंक मेमोरियल प्रार्थना स्थळात फादर जे.बी.चक्रनारायण यांनी संदेश वाचन केला. घोडेगाव, चांदे, करजगाव येथेही नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.