महसुलमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात रस्त्याच्या कामांवर भर

आनंद गायकवाड
Monday, 12 October 2020

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत.

संगमनेर (अहमदनगर) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत असून, जिल्हा परिषदेच्या 3054 निधीतून चिकणी, निमगाव भोजापूर ते राजापूर या रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरणाच्या 50 लाख रुपये निधीच्या कामाचा शुभारंभ कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात व जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

चिकणी येथे जिल्हा परिषदेच्या 3054 निधीतून चिकणी ते निमगांव भोजापूर रस्त्ता (10 लाख), निमगाव भोजापूर ते राजापूर रस्ता (10 लाख), थोरात यांच्या निधीतून चिकणी ते हरिभाऊ वर्पे वस्ती (15 लाख), जिल्हा परिषद सदस्य निधीतून चिकणी ते उदय वर्पे वस्ती (15 लाख) असे 50 लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, दूध संघाचे संचालक विलास वर्पे, सुनील कडलग, भारत वर्पे, आनंद वर्पे, प्रकाश कडलग, दत्तात्रेय गुंजाळ, संजय वर्पे, चंद्रभान वर्पे, संदीप वर्पे, संतोष कडलग, तसेच ग्रामसेविका उपस्थित होत्या. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commencement of strengthening and asphalting of Rajapur to Chikani road