esakal | ठेकेदारानी अगोदर वळणे काढावीत मग रस्त्याचे काम करावे... ‘या’ सरपंचांचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

Complaint of women sarpanches that Bari Sangamner road works are not going well

रस्ते बनवता की मृत्यूचे सापळे. रस्त्यावरील वळणे अजून तशीच त्यात धोक्याच्या सूचना नाही की काम सुरु असल्याचा बोर्ड नाही.

ठेकेदारानी अगोदर वळणे काढावीत मग रस्त्याचे काम करावे... ‘या’ सरपंचांचा संताप

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : रस्ते बनवता की मृत्यूचे सापळे. रस्त्यावरील वळणे अजून तशीच त्यात धोक्याच्या सूचना नाही की काम सुरु असल्याचा बोर्ड नाही. त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून हि वळणे काढली नाही तर ठेकेदाराचे काम थांबवावे लागेल, असा इशारा बारी, वारुंघुशी, वाकी, रंधा, कातळापुर, माळेगाव, भंडारदरा, केळुंगण, राजूर, जामगाव येथील महिला सरपंच व सरपंचानी दिला आहे.

बारी- संगमनेर रस्त्याचे काम सुरु असून या कामावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. त्यात रस्त्यावरील वळणे न काढता काम सुरु आहे. त्यामुळे या भागातील सरपंच ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आठ दिवसात लेखी खुलासा करा, नाही तर काम बंद करा, असा इशारा देण्यात आला आहे.

तालुक्यातील बारी ते संगमनेर रस्त्याचे काम सुरु झाले आहे. रस्त्याचे काम सुरु असताना येणाऱ्या जाणाऱ्यांना ट्रस्टचे काम सुरु आहे. पुढे वळण आहे व ज्या ठिकाणी मोऱ्या टाकण्यात येत आहे. त्या ठिकाणी कमी रुंदी असल्याने येणारी वाहने वेगाने येऊन येतात. ठिकाणी अचानक मोरी आल्याने ब्रेक दाबतात. त्यात अपघात होत आहेत.

आतापर्यंत सहा ते सात अपघात होऊन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. काहीजण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ठेकेदाराने अगोदर वळणे आहेत ती सरळ करून रस्त्याचे काम करावे. याबाबत सरपंचानी सार्वजनिक बांधकाम विभागाला भेटण्याचा प्रयत्न केला असता त्याचे कार्यालय कोरोनामुळे बंद असल्याचे सरपंचानी सांगितले आहे. ठेकेदार मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करूनही त्या बदल्यात झाडे लावत नाही. याबाबतही सरपंचानी नाराजी व्यक्त केली आहे. 

वारुंघुशीच्या सरपंच अनिता कडाळीं, रंधाच्या सरपंच अंजनाबाई कोरडे, कातळपूरच्या सरपंच सरजाबाई काठे, मालेगावच्या सरपंच पुष्प भांगरे, केळुंगानच्या सरपंच वनिता देशमुख, राजूरच्या सरपंच गणपतराव देशमुख, जामगावच्या सरपंच उषाताई पारधी, भंडारदराच्या सरपंच पांडुरंग खाडे, बारीच्या सरपंच तुकाराम खाडे यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. आठ दिवसात याबाबत लेखी खुलासा झाला नाही तर काम बंद आंदोलन करावे, लागेल असा इशाराही दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image