कोरोनामुक्त पतीला पत्नी म्हणाली, घरात यायचं नाही...

Conflict in Parner taluka due to home quarantine
Conflict in Parner taluka due to home quarantine

पारनेर ः तालुक्यातील एका खेड्यातील रहिवाशी व मुंबई येथे सरकारी नोकरीत असलेली व्यक्ती गावी आल्यानंतर तिचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्या नंतर त्याच्यावर नगर येथील सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले. तो बरा झाल्यानंतर त्यास काल (ता. 2 ) घरी सोडण्यात आले. 

गावातील लोकही त्यास होम क्वारंटाईन करण्यास तयार झाले. मात्र, घरी आल्यानंतर घरातील तसेच गावातीलही इतरांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही गावातील शाळेतच क्वारंटाईन व्हा असा आग्रह खुद्द त्याच्या पत्नीनेच धरला.

तालुक्यातील एका गावतील कोरोना पॉझिटीव्ह असलेला रूग्ण बरा होऊन गावी आला. त्यास डॉक्टरांनी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याने मी माझ्या घरी होम क्वारंटाईन होतो असे सांगितले.

त्यास त्याच्या पत्नीने साफ विरोध केला. तुम्ही गावातील शाळेतच क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. त्यावरूनच दोघांत जुंपली. क्वारंटाइनच्या मुद्दावरून कडाक्याचे भांडण झाले. पत्नी आपल्या मतावर ठाम होती. तिने पतीला शाळेतच क्वारंटाईन होण्यास भाग पाडले. पत्नीच्या या कडक भूमिकेचे कौतुक होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com