esakal | इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पंतप्रधानांना पाठविल्या शेणाच्या गौवऱ्या
sakal

बोलून बातमी शोधा

congress-protests-against-fuel-price

काँग्रेसने पंतप्रधानांना पाठविल्या शेणाच्या गौवऱ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

अकोले (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारने इंधन दरवाढीसह डाळ, तेलाचे भाव वाढविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सरकारने इंधन दरवाढ कमी करावी, अशी मागणी करीत तालुका काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोवऱ्यांची भेट पाठविण्यात आली. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. (congress-protests-against-fuel-price-hike-sent-dung-beetles-prime-minister-ahmednager-marathi-news)

केंद्र सरकारने देशाची अवस्था केली बिकट

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ अकोले तालुका काँग्रेस व विविध सेलच्या वतीने काल (बुधवारी) ढोल-ताशांच्या गजरात महात्मा फुले चौक ते अकोले बस स्थानकापर्यंत सायकल, बैलगाडी, हातगाडी फेरी काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

‘‘केंद्र सरकारने देशाची बिकट अवस्था करून ठेवली आहे. पंतप्रधान मोदी हुकूमशाही पद्धतीने देश चालवीत असून, त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला आहे. महागाईने सर्वसामान्य माणूस होरपळून निघाला आहे. सरकारचा भांडाफोड जनतेसमोर करणार आहोत.’’ - डॉ. सुधीर तांबे, आमदार

हेही वाचा: नियम पाळा अन्यथा तिसरी लाट अटळ; आरोग्य सल्लागारांचे सूचक वक्तव्य

‘‘सरकारने सात वर्षांत ३७५ वेळा इंधन दरवाढ केली. यातून नफेखोरी करून स्वतःची तिजोरी भरली आहे. ही समाजाची लूट असून, देशद्रोह आहे.’’ - मधुकरराव नवले, ज्येष्ठ नेते

ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, मीनानाथ पांडे, सोन्याबापू वाकचौरे, राज्य सरचिटणीस उत्कर्षा रूपवते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

(congress-protests-against-fuel-price-hike-sent-dung-beetles-prime-minister-ahmednager-marathi-news)

हेही वाचा: शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

loading image