नगर जिल्ह्यातील 88 हजार पालकांची शाळेसाठी संमती 

दौलत झावरे
Sunday, 10 January 2021

जिल्ह्यातील 1209पैकी 939 शाळा ऑफलाइन सुरू झाल्या असून, सध्या 67 हजार 597 विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. सुमारे 88 हजार पालकांनी संमतिपत्रे दिली आहेत.

नगर ः राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सरकारने शाळा व महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू केल्या.

जिल्ह्यातील 1209पैकी 939 शाळा ऑफलाइन सुरू झाल्या असून, सध्या 67 हजार 597 विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. सुमारे 88 हजार पालकांनी संमतिपत्रे दिली आहेत. 

जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या एक हजार 209 शाळा असून, त्यांमध्ये 16 हजार 877 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये दोन लाख 84 हजार 354 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

हेही वाचा - विधवेसोबत दिराने बांधली लग्नगाठ

शासनाच्या निर्देशानुसार 15 हजार 886 शिक्षकांची कोरोना तपासणी झाली असून, त्यांतील 172 जण पॉझिटिव्ह आढळून आले. अद्याप सुमारे एक हजार शिक्षकांच्या तपासण्या बाकी असून, प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन करून जिल्ह्यातील 939 शाळा सुरू झाल्या, त्यामध्ये 67 हजार 597 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

आकडेवारी 

  • इयत्ता 9वी ते 10वीच्या शाळा ः 1209 
  • ऑफलाइन शाळा ः 939 
  • शिक्षकांची संख्या ः 16,877 
  • आरटीपीसीआर चाचण्या ः 15,886 
  • पॉझिटिव्ह शिक्षक ः 172 
  • इयत्ता 9वी ते 12वीची पटसंख्या ः 2,84,354 
  • विद्यार्थ्यांची उपस्थिती ः 67,597 
  • पालकांची संमतिपत्रे ः 87,648 
  • संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consent of 88,000 parents in Nagar district