कृषी विद्यापीठातील वसाहतींमध्ये  दूषित पाणीपुरवठा

कृषी विद्यापीठातील वसाहतींमध्ये  दूषित पाणीपुरवठा

राहुरी विद्यापीठ, : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पंधरा ते वीस दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी व पिण्याचे पाणी साठवणुकीच्या तळ्यात एकत्र झाल्याने हे पाणी अत्यंत खराब झाले आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा वसाहतीमध्ये होत आहे. 

या दूषित पाण्यामुळे विद्यापीठातील रहिवासी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. विद्यापीठातील शेतकरी निवासात जिल्ह्यातील, तसेच तालुक्‍यातील संशयितांना, तसेच बाहेरगावाहून आलेल्या कर्मचाऱ्यांना क्‍वारंटाईन करण्यात आले.

याच शेतकरी निवासच्या ड्रेनेजचे सांडपाणी उघड्यावर सोडले आहे. विद्यापीठाच्या कर्मचारी वसाहतीत, तसेच कार्यालयांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठा तळ्याच्या शेजारीच विद्यापीठ अभियंता कार्यालयाच्या एका ठेकेदाराने या परिसरातील माती खोदली. तसेच नुकत्याच झालेल्या पावसामुळे हे पाणी एकत्र झाल्याची शंका व्यक्त होत आहे.

 
दूषित पाणीपुरवठ्याबाबत कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या आहेत. याबाबत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन शाखेचे उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी राहुरीच्या तहसीलदारांना याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता हे लाखो लिटर पाणी असलेले तळे गोपनीयरीत्या खाली करण्याचे काम सुरू असल्याचे समजते. अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com