पोपटराव पवार म्हणतात, ग्रामीण रस्त्यांसाठी राष्ट्रीय महामार्गासारखीच तरतूद हवी

Popatrao Pawar says, rural roads should be provided in the same way as national highways
Popatrao Pawar says, rural roads should be provided in the same way as national highways

नगर ः नद्यांमधील वाळूचे लिलाव व खडी क्रशर असलेल्या भागातील रस्ते सातत्याने नादुरुस्त होतात. राष्ट्रीय महामार्ग तयार करताना जशी तरतूद करण्यात येते, तशी तरतूद या भागातील रस्त्यांसाठी केल्यास ते मजबूत होतील व जड वाहतुकीमुळे खराब होणार नाहीत.

तसा निर्णय झाल्यास रात्री-अपरात्री होणारी वाहतूक थांबून रस्तेअपघातांचे प्रमाणही कमी होईल, असे पत्र राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. 

पत्रात पवार यांनी म्हटले आहे, की नद्यांमधील वाळूलिलाव व खडी क्रशर असलेल्या भागातील रस्ते सातत्याने नादुरुस्त होतात. लोकांना वाळू, खडी, मुरूम, क्रश सॅंड व डबर आदींची बांधकामासाठी आवश्‍यकता असते. मात्र, ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती या वाहतुकीसाठी सक्षम नाही. त्यामुळे हे रस्ते वारंवार खराब होतात. रॉयल्टीच्या उत्पन्नातून या भागातील रस्त्यांची दुरुस्ती झाल्यास नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळतील व त्यांचा त्रास कमी होईल.

शासन निर्णयानुसार अडीच ब्रासपेक्षा जास्त वाहतूक ग्रामीण भागातील रस्त्यांवरून करण्यास परवानगी नाही. मात्र, अडीच ब्रास वाहतूक वाहनमालकांना परवडत नाही. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊन त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.

राष्ट्रीय महामार्ग बनविताना जशी तरतूद असते, तशी तरतूद ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी केल्यास ते मजबूत होतील व जड वाहतुकीने खराब होणार नाहीत. शिवाय, अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com