कोरोनाने नगरकरांना केले सळो की पळो... आज सव्वापाचशेचा आकडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

अँटिजन चाचणी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकाच वेळी 284 रुग्ण सापडण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

नगर ः जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एकामागून एक कोरोना पॉझिटिव्ह अहवालाचे विक्रम होत आहेत.

जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत 534 पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात अँटिजन चाचणीत तब्बल 284 जणांचे बाधित आढळले. खासगी लॅबच्या अहवालांमध्ये 217, तर जिल्हा रुग्णालयातील लॅबच्या अहवालांत 34 पॉझिटिव्ह आढळले. 

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच हजारांच्या पुढे गेली आहे. जिल्ह्यातील 5508 बाधितांपैकी 3639 जण बरे होऊन घरी परतले असून, 1795 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 74 झाली आहे.

हेही वाचा - गाढ झोपेत असताना आले पाणी अन

अँटिजन चाचणी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकाच वेळी 284 रुग्ण सापडण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. दुपारी बारा वाजता जिल्हा रुग्णालयातील लॅबच्या अहवालामध्ये एकूण 24 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यात महापालिका हद्दीत नऊ, नेवाशात तेरा, जामखेडमध्ये दोन रुग्ण आढळले.

सांयकाळच्या अहवालात जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये नऊ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नेवासे दोन, नगर शहर दोन व अकोल्यातील सात रुग्ण सापडले. 
अँटिजन चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या 284 जणांमध्ये श्रीगोंदे तालुक्‍यातील तब्बल 60 जणांचा समावेश आहे.

संगमनेरमध्ये 27, राहात्यात नऊ, पाथर्डीत 25, नगर ग्रामीणमध्ये 15, श्रीरामपूरमध्ये 12, कॅन्टोन्मेंटमध्ये 13, नेवाशात 20, श्रीगोंद्यात 60, पारनेरमध्ये 17, राहुरीत सहा, शेवगावमध्ये 43, कोपरगावमध्ये 12, जामखेडमध्ये 22 आणि कर्जतमध्ये तीन रुग्ण या चाचणीत आढळले. 

खासगी प्रयोगशाळेतील अहवालामध्ये महापालिका हद्दीत 175, संगमनेरमध्ये पाच, राहात्यात 13, पाथर्डीत चार, नगर ग्रामीणमध्ये पाच, श्रीरामपूरमध्ये चार, कॅन्टोन्मेंटमध्ये एक, नेवाशात एक, श्रीगोंद्यात एक, पारनेरमध्ये चार, शेवगावमध्ये दोन, कोपरगावमध्ये एक व कर्जतमध्ये एक जण बाधीत आढळला. 

जिल्ह्यात साडेतीन हजारांवर रुग्ण झाले बरे 
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात एकूण 279 जण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3639 झाली आहे. आज घरी गेलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 117, संगमनेरमधील 38, राहात्यातील 18, पाथर्डीतील 14, नगर ग्रामीणमधील 21, श्रीरामपूरमधील पाच, कॅन्टोन्मेंटमधील 23, नेवाशातील एक, श्रीगोंदेतील एक, पारनेरमधील दहा, अकोल्यातील 12, राहुरीतील सात, शेवगावमधील चार, कोपरगावमधील पाच, कर्जतमधील तीन रुग्णांचा समावेश आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona all over five hundred patients