कोरोनाने एक हजार नगरकरांचा घेतला जीव

दौलत झावरे
Tuesday, 15 December 2020

दरम्यान, आज 187 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 64 हजार 462 झाली. मृत रुग्णांची संख्या 1001 झाली आहे.

नगर ः कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असली तरी हलगर्जीपणा करू नका, असे प्रशासनातर्फे आवाहन केले जात आहे. कोरोनावर अद्यापि लसीकरण  सुरू झालेले नसल्याने लोकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात आलेल्या या महामारीने धुमाकूळ घातला आहे. लागण झालेली आणि मृतांची संख्याही लक्षणीय आहे. तब्बल एक हजार जणांचा जीव कोरोना घेतला.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या आज एक हजार पार झाली. जिल्ह्यात दिवसभरात 151 कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे बाधितांची संख्या 66 हजार 678 झाली. 

हेही वाचा -  एकदाच लागवड करा, मग या फळबागेतून पैसाच पैसा

दरम्यान, आज 187 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 64 हजार 462 झाली. मृत रुग्णांची संख्या 1001 झाली आहे.

सध्या 1215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 96.68 झाली होती. जिल्हा रुग्णालयाच्या तपासणी अहवालात आठ, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 40, तर अँटीजेन चाचणीत 103 बाधित आढळून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona disease one thousand Death of Ahmednagar

Tags
टॉपिकस
Topic Tags: