कोरोनाने नगरकरांची झोप उडवली... 16 जण पॉझिटिव्ह 

corona 19
corona 19

नगर : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू असले, तरी बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सकाळपासून कोरोना बाधितांचा आकडा न येता, रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून आली. त्यामुळे कोरोनाला अटकाव झाला या आनंदात सर्व होते. रात्री उशिरा 16 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. 

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना  टेस्ट लॅब मध्ये आज सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर येथील १०, नगर महापालिका क्षेत्रातील तीन, नेवासा तालुक्यातील एक, जामखेड तालुक्यातील एक आणि पुणे जिल्ह्यातील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.

संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनी येथील पाच, नवघर गल्ली येथील एक तसेच संगमनेर तालुक्यातील नान्नज येथील ०२, खांडगाव, , चिखली येथील प्रत्येकी एक जण बाधित आढळून आला आहे. नेवासा तालुक्यातील गुंडगाव येथील एक, जामखेड तालुक्यातील लोणी (पोस्ट - खर्डा) येथील एक रुग्ण बाधित आढळले आहेत. नगर शहरात गुलमोहर रोड, आशा टॉकीज आणि सारसनगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. विश्रांतवाडी (पुणे) येथील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.

संपादन - अमित आवारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com