निमोणमधील कोरोनाबाधिताचा मृत्यू, पत्नी, आईलाही लागण

Corona patient dies in Nimon, wife, mother also infected
Corona patient dies in Nimon, wife, mother also infected

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. या रुग्णाचा शनिवारी ( ता. 23 )  रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बाधिताची संख्या तीन झाली आहे.

निमोण येथील एका दुकानदाराला कोरोनाची बाधा झाली होती. या बाधित व्यक्तीच्या संपर्कात त्यांच्या घराशेजारी राहणारा हा दुसरा रुग्ण आला होता. पहिल्या बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या रुग्णाला घसा दुखणे व श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने हा रुग्ण नाशिक येथे पोलीस असलेल्या मुलाकडे उपचारासाठी गेला होता. नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोणाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले होते.

या रुग्णासोबतच मंगळवार (ता. 19) रोजी त्याची वयोवृद्ध आई तसेच शनिवार ( ता. 23) त्याच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. या कुटुंबावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असतानाच अवघ्या आठ दिवसातच शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याला मृत्यूने गाठले.   

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com