धक्कादायक! श्रीरामपूर तालुक्यात नव्याने १२ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

गौरव साळुंके 
Sunday, 19 July 2020

शहरासह परिसरात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळले असुन शनिवारी (ता. १८) दिवसभरात १२ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. शहरातील विविध भागातील दोन कुटूंबातील व्यक्तींसह रॅपीड तपासणीतील एकाचा त्यात समावेश आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरासह परिसरात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळले असुन शनिवारी (ता. १८) दिवसभरात १२ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. शहरातील विविध भागातील दोन कुटूंबातील व्यक्तींसह रॅपीड तपासणीतील एकाचा त्यात समावेश आहे. शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात तीन तर दुपारी रॅपीड तपासणीतील एकासह रात्री उशीरा आठ रुग्ण कोरोना पॉझिटीव आढळुन आले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८७ वर पोहचली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आरोग्य विभागाकडुन कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात असुन शहरातील संतलुक रुग्णालयात कोरोना अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, बेलापूर परिसरातील एका तरुणांचा अहवाल आज पाॅझिटीव्ह आल्याने प्रशासनाकडुन त्याच्या घराचा परिसर सील करण्यात आहे. १२ दिवसांपूर्वी संबधीत तरुणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेतला होता. आज सकाळी तो अहवाल प्राप्त झाला. आरोग्य विभागाने संबधीत तरुणाच्या घशातील स्त्राव घेवुन अहवाल प्राप्त होण्यापुर्वीच त्याला घरी सोडले होते. त्यानंतर सदर रुग्ण गावात फिरल्याने प्रशासनासह ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली आहे. आज नव्याने त्याची रॅपीड तपासणी केली त्यात तो निगेटिव्ह आल्याने तो घरीच बरा झाल्याचे समोर आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी १२ दिवस लागले. तोपर्यंत तो गावात फिरल्याने धास्ती वाढली आहे. खबरदारी म्हणुन तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत संशयीतांना क्वाॅरंटाईन ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी शहर बंद ठेवण्याबाबत स्थानिक प्रशासनावर बंधने आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने आपल्या कुटूंबासह शहरासाठी पुढील सात दिवस स्वयंस्फुर्तीने बंद पाळुन संसर्गाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे. असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive report of new 12 people in Shrirampur taluka