ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची कोरोना टेस्ट.... रिपोर्ट आला

Corona test of senior social activist Anna Hazare
Corona test of senior social activist Anna Hazare

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची रॅपिड अँटीजेन व स्वॅब चाचणी केल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. हजारे यांच्या कोरोनाच्या दोन्ही चाचण्यांचा रिपोर्ट आला आहे.

राळेगणसिद्धी येथे आतापर्यंत सहा कोरोनाबाधित आढळून आले आहेत. हजारे सध्या राहत असलेला हिंद स्वराज ट्रस्ट परिसर 14 दिवसांसाठी प्रतिबंधक क्षेत्र म्हणून तहसीलदार ज्योती देवरे यांनी जाहीर केला होता. राळेगणसिद्धी येथील वर्तमळा भागातील महिला कोरोनाबाधित आढळली.

हिंद स्वराज ट्रस्ट परिसरात कर्मचारी म्हणून तिचा पती कामाला होता. त्यामुळे खबरदारीचा खबरदारीचा उपाय म्हणून हजारे यांची कोरोनाचाचणी करण्यात आली. त्यात दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. चाचण्या निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

अण्णांच्या रिपोर्टकडे पारनेरसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतो आहे. लॉकडाउन उठल्यानंतर मोठ्या प्रमाणात पुणे आणि मुंबईहून भूमिपूत्र तसेच काही पाहुणे पारनेर तालुक्यात आले. सर्वाधिक संख्या होती ती जावयांची. त्यांच्यामुळे पारनेरमध्ये लागण झाल्याचे वारंवार स्पष्ट झाले. 

बाहेर लोकांना क्वारंटाइन करणे आवश्यक असतानाही प्रमाणापेक्षा जास्त ढिल दिली जात होती. आता तर लॉकडाउन उठल्याने लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढला आहे. त्यामुळे समूह संसर्ग झाला आहे. परिणामी कोरानाची साखळी तोडताना अडचण निर्माण होत आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com