जेसीबी, चार ट्रॅक्‍टर जप्त; राहुरीत मातीचे उत्खननप्रकरणी आठजणांविरोधात गुन्हा

विलास कुलकर्णी 
Friday, 2 October 2020

मांजरी येथे शेतातील मातीचे बेकायदा उत्खनन करताना पोलिसांनी एक जेसीबी, चार ट्रॅक्‍टर, असा 45 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

राहुरी (अहमदनगर) : तालुक्‍यातील मांजरी येथे शेतातील मातीचे बेकायदा उत्खनन करताना पोलिसांनी एक जेसीबी, चार ट्रॅक्‍टर, असा 45 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध पर्यावरण संरक्षण व शेतातील माती काढून टाकण्याच्या कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. 

संदीप एकनाथ विटनोर (रा. मांजरी), आशीर लालाभाई शेख (रा. पिंप्री वळण), सुनील दादा जंगले, ज्ञानेश्वर रखमाजी कंक, नवनाथ ज्ञानेश्वर जंगले, जिजाबाई वसंत जंगले (चौघेही रा. पानेगाव, ता. नेवासे), मोहंमद शेख (रा. खेडले परमानंद, ता. नेवासे), जनार्दन गागरे (पूर्ण नाव पत्ता समजला नाही) अशी गुन्हा नोंदविलेल्यांची नावे आहेत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मांजरी येथे गट नंबर 618मधील शेतजमिनीतील शासनाच्या मालकीची माती विनापरवाना, बेकायदा उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काल (बुधवारी) दुपारी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी पथकासह घटनास्थळी छापा घातला. पोलिसांना पाहताच संशयित पसार झाले. कॉन्स्टेबल श्रीकृष्ण केकाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against eight persons in soil excavation case in Rahuri taluka