मनसेच्या पदाधिकाऱ्याकडे सापडलं घबाड

Crime against Maharashtra Navnirman Sena leader
Crime against Maharashtra Navnirman Sena leader

नगर :  ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमविल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष व पंचायत समितीचा माजी सदस्य देवीदास लिंबाजी खेडकर व त्यांची पत्नी एकनाथवाडीच्या सरपंच सविता यांच्या विरु्दध अहमदनगर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

सुमारे बारा लाख पाच हजार ४४५ रुपयाची संपत्ती जमा केल्याचा खोडकर दाम्पत्यावर आरोप आहे. पोलिस निरीक्षक शाम पवरे यांनी गुरुवारी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

देवीदास खेडकर एकनाथवाडीचा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व त्या नंतर पाथर्डी पंचायत समितीचा सदस्य असताना २००१ ते २०१८ या कालावधी ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती.

याची उघड चौकशी सुरु असताना परिक्षण  कालावधी सन २००१ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत त्यांचे सर्व ज्ञात कायदेशीर उत्पन्नातुन मिळविलेली एकुण मालमत्ता व त्या कालावधीतील त्यांचा व त्यांचे कुटुंबियांचा एकुण उत्पन्न  खर्च यांचा तौलनिक अभ्यास केला असता, त्याने वर नमूद परिक्षण कालावधीत सन २०११ या वर्षांमध्ये त्या वर्षीच्या एकुण उत्पन्नाचे ११९ टक्के  ( १२०५४४५ रुपये) इतकी जास्त मालमत्ता (अपसंपदा) संपादित  केली असल्याचे मालमत्तेचे उघड चौकशी मध्ये निष्पन्न झाले आहे. 

सदरची अपसंपदा संपादित  करणे  करीता  सविता खेडकर यांनी प्रोत्साहन दिले म्हणून खेडकर दाम्पत्यावर पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुरुवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक दीपक कारंडे तपास करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com